भक्तीसागर कोविड केअर सेंटरला सध्या १०० बेडची व्यवस्था

   पंढरपूर,दि.१६/०९/२०२०- ६५ एकर भक्तीसागर कोविड केअर सेंटरला सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बी.के.धोत्रे ,नगरअभियंता नेताजी पवार यांचे समवेत पाहणी केली.


यावेळी गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी नगराध्यक्षा,सर्व नगरसेवक,उपविभागीय अधिकारी सचिन ढोले ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या ठिकाणी १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे व भविष्यात अजून १०० बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ५० बेडला ऑक्सीजन चीही व्यवस्था करण्यात आली आहे परंतु मेडिकल स्टाफ परिपूर्ण नसल्याने तो मिळाल्यास ऑक्सीजन व्यवस्था सुरु करण्यात येईल .आता पर्यंत २४७ पॉझिटिव्ह रुग्णानी उपचार घेतले असून सध्या याठिकाणी ७५ रुग्ण अँडमिट आहेत

जिल्हा परिषद अध्यक्षनी ६५ एकर येथील EOC सेंटरचीही पाहणी केली. काही अडचणी असल्यास त्या नक्की सोडवण्यात येईल असे सांगितले व नगरपरिषदने चांगली सुविधा दिल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांचे सोबत शिवसेना विभाग प्रमुख तानाजी मोहन मोरे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष दादा थिटे ,संतोष बंडगर हे उपस्थित होते.
 
Top