कै. वा.ना.उत्पात समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रात कार्यरत

पंढरपूर ,२८/०९/२०२० - भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांचे कोरोना संसर्गाने पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सोमवारी २८ सप्टेंबर रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले .

वा.ना.उत्पात हिंदुत्वावादी विचारसरणीचे होते. त्यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास होता. त्यांनी स्वा.सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रातील प्रसिध्द नाव होते.त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषविले होते. ते पंढरपूर एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष होते.कै. वा.ना.उत्पात अनेक वर्षे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत होते.कै.वा.ना.उत्पात पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे .

कै.वा.ना.उत्पात यांच्या पश्‍चात चार मुली,एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.
 
Top