जेऊर,२९/०९/२०२० -पंढरपूर येथे डॉ.शीतल शहा यांच्या सहकार्याने एक युवक शिबीर व त्यास जोडून बाळ आरोग्य तपासणी अशा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विकास संस्थेद्वारे करण्यात आले होते .

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय वा .ना. उत्पात यांना मी आग्रहाने निमंत्रित केलेलं होते .सर्वांना आश्चर्य होत होते. वा .ना. हे तर आध्यात्मिक विषयात उत्तुंग व्यक्तित्व ! आम्ही आयोजक व बाहेरून आलेले सर्व रॉयीस्ट !
एम.एन.रॉय विचाराचे !!

    पण याचा खुलासा करताना वा .ना .उत्पात म्हणाले,"ज्यांना बुद्धीचा अहंकार आहे त्याने रॉय अभ्यासावा,म्हणजे आपण कोठे आहोत हे समजेल !मी गुणवत्ता अवलोकन करूनच निमंत्रण स्वीकारतो !"

   यातून वा.ना. समजतात ! माझे व त्यांचे खूप चांगले संबंध होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आनंद कोठडीया ,जेऊर, जि.सोलापूर 
९४०४६९२२०
 
Top