डोक्यात कोयत्याने वार करून

पंढरपूर - ०४/०९/२०२० रोजी ०९.३० व ११.०० वाजताचे सुमारास मौजे देगाव ,तालुका पंढरपूर गावचे शिवारातील गणेश गांडुळे यांच्या शेताजवळ आरोपी लाला बबन शिंदे, राहणार बाबळगाव , तालुका पंढरपूर यानेे हरी पवार यांच्यावर कोयत्याने वार करून व लाथांनी मारून जीवे ठार मारले व फिर्यादिच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सतीश उर्फ बाळू हरी पवार, वय ३० वर्ष, राहणार बाभळगाव,तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी लाला बबन शिंदे, राहणार बाबळगाव तालुका पंढरपूर याला ताब्यात घेतले आहे.

पूर्वी दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून भांडण

दिनांक ०४/०९ /२०२० रोजी सकाळी ०९.३० वाजता च्या सुमारास फिर्यादी व त्याचे आई-वडील शेतातील घरी असताना यातील आरोपी लाला बबन शिंदे रा.बाबळगाव यांनी पूर्वी दिलेल्या (२०१६) तक्रारीच्या कारणावरून भांडण काढून फिर्यादीचे वडील हरी यांना हऱ्या तुला आज ठेवत नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या हातातील दगड व शेजारी पडलेले दगड उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकून मारले त्यात फिर्यादीच्या उजव्या हाताचे खांद्यावर व पोटावर जखम झाली त्याबाबत फिर्यादी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेला त्याच्या वडिलांसोबत तक्रार देणे करता मोटरसायकलवरून येत असताना आरोपी लाला शिंदे यांनी मौजे देगावच्या शिवारातील गणेश गांडुळे यांच्या शेताजवळ ११.००वाजताच्या सुमारास मोटरसायकलला त्याची मोटरसायकल आडवी लावून कोयता घेऊन हाऱ्या तुला आता जित्ता सोडत नाही,असे म्हणून हातातील कोयत्याने फिर्यादीचे वडील हरी पवार यांच्यावर कोयत्याने वार करून व लाथांनी मारून जीवे ठार मारले व फी"च्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु. र. न. 405/2020 कलम 302,307, 323,504, 506, 341 भा. द. वी. स.दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पाटील यांनी भेट दिली असून सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि.खरात हे पोलीस निरीक्षक,पंढरपूर तालुका पोलीस ठाणे किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
 
Top