यांचेसह ४०० ते ५०० लोकांवर गुन्हा दाखल

पंढरपूर, ३०/०९/२०२०- पो.हे.काँ. परशुराम तात्याराम शिंदे, वय ४२ वर्षे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी शहर पो.ठाणे येथे दाखल केलेल्या गु र नं 660/2020 भादविकाक 143, 269, 188, सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3)/135, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897चे कलम २, ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यात दिलीप धोत्रे,शशिकांत पाटील,प्रशांत गिड्डे,सौ.निकीता पवार,सौ.रंजना इंगोले,सौ.पुजा लावंगकर यांचेसह ४०० ते ५०० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन

दि.२९/०९/२०२० रोजी सकाळी १०.४५ ते ११.४५ वा. दरम्यान शिवाजी चौक, पंढरपूर ता-पंढरपूर,जि.सोलापूर येथे जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर जिल्हा यांचे आदेश क्रं. 2020/डिसीबी-02/ आरआर/4028दि.31/08/2020 तसेच क्रं. डिएमयु/2020/सी.आर-92/ डीआयएसएम-1, दि.३०/०९/२०२० रोजीचे १२.०० वा.पर्यन्त कोरोना रोगाच्या अनुशंगाने लाँकडाऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना आदेश पारीत करून तो समाज माध्यमात व लेखी स्वरूपात प्रसिध्द करूनही यातील महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सौ.निकीता पवार, सौ.रंजना इंगोले, सौ.पुजा लावंगकर यांचेसह ४०० ते ५०० लोकांनी जमाव जमवून, मास्क न घालता व सोशल डिस्टंसींग न पाळता संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन करून ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होवून मोठ-मोठयाने घोषणाबाजी करत मोर्चा आंदोलन केले म्हणून फिर्याद दिल्याने सदर गुन्हा रजिष्टरी दाखल करून कोर्टात पाठवले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोसई/ गाडेकर हे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे सांगण्यावरून करत आहेत. हा गुन्हा ता ३०/०९/ २०२० रोजी ००.४० वा दाखल करण्यात आला.
 
Top