आरक्षण मिळावे यासाठी सरकारला जागे करण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले


पंढरपूर,२७/०९/२०२०- मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा गरीब वर्गाला डोळ्यासमोर ठेवून त्यांना आरक्षण मिळावे यासाठी सरकारला जागे करण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले.मराठा समाजातील कष्टकऱ्यांचे कामगारांचे स्वप्न त्यांनी पाहिले होते समाजासाठी जी भूमिका त्यांनी मांडली होती ती आता पूर्णत्वास जावी. त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, बलिदान दिले त्याला न्याय मिळावा,अशी अपेक्षा आज त्यांच्या जयंती दिनी व्यक्त करत आहे असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी काढले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेले रक्तदान शिबिर व कोरोना महामारीमध्ये ज्यांनी मोलाचे काम केले अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रम येथील तांबट धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर कोरोना योद्धा म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले ,मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले, शहर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप केचे,तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर,शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनिल कदम ,उपजिल्हा रुग्णालयाचे पुरुषोत्तम कदम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगीरथ भालके उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले की,महाराष्ट्रात सोलापूर जिल्हयात कोरोना जादा मृत्युदर असलेला जिल्हा होता परंतु लोकांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन करण्याचे काम प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी केले असल्या मुळे आता ते आटोक्यात आले आहे .

भगीरथ भालके म्हणाले की,कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने मराठा महासंघाने रक्तदान शिबिराचे घेतलेले कार्यक्रम समाजहिताचा कार्यक्रम असून , कोरोना युद्धांचा सन्मान समाज व महासंघाच्या वतीने करण्यात आल्यामुळे सन्मान प्राप्त व्यक्तींना अनेक जोमाने काम करता येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली .

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण म्हणाले की,रक्तदान श्रेष्ठदान असून जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे .याठिकाणी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस १५ लिटर पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमांमध्ये १५१ जणांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम बिस्किटे सर यांनी केले .यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,बापु कदम, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे,शहराध्यक्ष अमोल पवार, शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रणव गायकवाड, विनायक पडवळे,सचिन थिटे,पांडुरंग शिंदे,महेश माने, गणेश काळे, दादा आसबे, श्रीकांत माने, महेश बिस्किटे, विनायक चव्हाण, रोहित चव्हाण, वैभव चव्हाण, संतोष चव्हाण, बालाजी बोबडे, पप्पू पाटील, प्रदीप साळुंखे, संतोष घाडगे, महेश उंबरकर,भास्कर घायाळ,सुरेश पवार,अक्षय पवार, समर्थ मोळक,सोमा झेंडे,महेश माने,प्रशांत जाधव, गणेश जाधव, विकास घाडगे, दिगंबर जाधव, विजय डुबल,गणेश घाडगे,विजय काळे, ऋषिकेश मोरे, गणेश माने, ज्ञानेश्वर सावंत सर, भाऊराव जाधव, महेश चव्हाण, ऋषिकेश शिंगारे, पैलवान मुन्ना शिंगारे ,कल्याण पाटील,वैभव कदम यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top