मराठा महासंघाच्यावतीने ८७ वी जयंती उत्साहात साजरी

    पंढरपूर,(प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूरात माथाडी कामगारांचे आराध्यदैवत व मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची ८७ वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण व शहराध्यक्ष अमोल पवार यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वेरीचे डॉ प्रशांत पवार हे होते. प्रारंभी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला. यावेळी समाजात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्यांचा तसेच प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत पवार यांना नुकताच भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर पुरस्काराने देशात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते यासाठी मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला .

अण्णासाहेब पाटील जयंतीच्या निमित्ताने रविवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते चार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे समाजाच्या कामासाठी व समाज हितासाठी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले. कोरनासारख्या महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून ज्यांनी काम केले अशा अधिकाऱ्यांचा,डॉक्टरांचा सन्मान मराठा महासंघाच्यावतीने करण्यात येणार आहे.

जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिलाध्यक्ष डॉ संगीता पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन शहराध्यक्ष अमोल पवार यांनी केले. यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव,माळशिरस तालुकाध्यक्ष शामराव गायकवाड,तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे, शहराध्यक्ष अमोल पवार,भाऊसाहेब पवार,शहर संघटक काका यादव,महिला आघाडी तालुका अध्यक्षा प्रा रजनीताई जाधव, शहराध्यक्ष डॉ संगीता पाटील,शहर उपाध्यक्षा अश्विनी साळुंखे, शहर संघटक रतन थोरवत,कु स्वरा अनपट,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रणव गायकवाड,विनायक पडवळे,सचिन थिटे,पांडुरंग शिंदे,महेश माने यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top