पंढरपूर - देशामध्ये लॉकडाऊन झाले त्यामुळे संपूर्ण देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली. चैञी वारी तसेच आषाढी वारी खंडित झाली. उद्योग व्यवसाय बंद झाले येणारा ,अधिक महिना होणार नाही देश आर्थिक संकटात सापडले असून महाराष्ट्रातील घरगुती व व्यासायिक वीज बिल ग्राहकांना वाढीव वीज बिल आली. यामुळे संतोष कवडे यांनी धरणे आंदोलनाच इशारा दिला होता .


आंदोलनाच्यावेळी सोशल डीस्टन्स पाळून तोंडाला मास्क लावून साॅनिटायझरचा वापर करून आंदोलन करण्यात आले.यावेळी साधारण २०० ते २५० नागरिक उपस्थित होते .

घरगुती वीजधारकांना वीज बिलमध्ये ५०% सुट मिळावी

यावेळी घरगुती वीजधारकांना वीज बिलमध्ये ५०% सुट मिळावी, व्यवसायिक वीजधारकांना युनिट प्रमाणेच वीज बिल भरुन घेण्यात यावे,स्थिर आकार रद्द करावा ,व्याज व व्याजाची थकबाकी माफ करावी, समायोजीत रक्कम माफ करावी , वहन आकार १.४५ Rs/U माफ करावा, वीज शुल्क २१ % व १६ % माफ करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

यावेळी पोलिस प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करून म विद्युत महामंडळाचे उपअभियंते रविंद्र भुतडा यांचेबरोबर चर्चा करुन दिली. यावेळी श्री भुतडा यांनी कोणाचेही विज कनेक्शन कट केले जाणार नाही व तुमच्या सर्व मागण्या वरिष्ठांना कळवतो असे लेखी आश्वासन दिले .

सध्या हायकोर्टात याचिका दाखल

सध्या हायकोर्टात याचिका दाखल असून त्याचा निकाल येणे बाकी आहे जर काही तोडगा नाही निघाला तर कोणीही वीज बिल भरु नये जर कोणी विज कट करण्यास आले तर आम्हाला कळवावे आम्ही आमच्या पध्दतीने उत्तर देऊ असे आवाहन संतोष कवडे यांनी केले आहे.
 
Top