ग्राहकांना वाढीव वीज बिल

पंढरपूर - लॉकडाऊन झाल्याने संपूर्ण देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली. उद्योग व्यवसाय बंद झाले त्यामुळे लोक आर्थिक संकटात सापडले. असतानाच महाराष्ट्रात वीज मंडळाने घरगुती व व्यासायिक वीज बिल ग्राहकांना वाढीव वीज बिल दिली.


 सरासरी न देता युनिटप्रमाणेच वीज बिल घेण्यात यावे 

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना वाढीव वीज बिलामुळे मोठे संकट ओढवले आहे . हे वाढीव आलेले वीज बिल कमी करण्यासाठी, घरगुती वीज धारकांना वीज बिलामध्ये सुट मिळावी, व्यवसायिक वीजधारकांना सरासरी न देता युनिटप्रमाणेच वीज बिल घेण्यात यावे आणि जोपर्यंत वीज बिलधारक वीज बिल भरत नाहीत तोपर्यंत त्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये असे निवेदन पंढरपूर येथील महावितरण कंपनीचे अधिकारी रविंद्र भुतडा यांना देण्यात आले.यावेळी अधिकारी रविंद्र भुतडा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वीज बिल भरण्यासाठी ३ टप्प्यात थोडे थोडे पैसे भरणे किवा एकदम पैसे भरले तर २ टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले . त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील ग्राहकांचे शंकेचे निरसन करण्यासाठी मीटिंग बोलावण्याचे मान्य केले आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचेबरोबरही याबाबतीत चर्चा केली त्यांनीही संबंधित आधिकार्यांशी चर्चा केली आहे .
जर या काही दिवसात तोडगा नाही निघाला तर कोणीही विज बिल भरु नये जर कोणी आपले लाईट कट करण्यास आले तर आम्हाला कळवावे आम्ही आमच्या पध्दतीने उत्तर देऊ असे आवाहन संतोष कवडे यांनी केले

यावेळी s.p गायकवाड, निलेश कोरके, विशाल आर्वे, स्वप्नील घुले,विनोद लटके, दत्ता लटके,विकी झेंड,तात्या जगताप, अतुल लटके, बाबु थिटे, शिवाजी नवञे,राज थिटे, दिपक नवञे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते
 
Top