कोराना विरुद्धच्या लढाईबरोबरच आर्थिक व्यवहार   

मुंबई,२६/०९/२०२० - कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचे राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं तसेच कोराना विरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

त्यांनी देशात covid-19 जास्त प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब, तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते.कोरोनाचा प्रसार, प्रभाव कमी करून सर्व व्यवहार सुरळीत राहण्याच्यादृष्टीने या पुढच्या काळात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र हा उपाय परिणामकारक ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोठी हाँस्पिटल उभारणी करण्याबरोबर त्याठिकाण रुग्णांसाठीच्या सोयीसुविधा आणि लागणारा औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात मिळेल अशी व्यवस्था करण्यात यावी.या आरोग्य सेवेमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य पावले प्रशासनाकडून उचलण्याची गरज आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्यरितीने पालन केले पाहिजे.आरोग्य सेवेत फसवणूक करणाऱ्यांविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.रूग्ण आणि नातेवाईक यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे लागणार आहे.


महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातूनची लढाई अधिक आक्रमकपणे लढली जात असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले . राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार असून राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा देण्याची व्यवस्था प्रयोगशाळा उभारली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
Top