३४०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

पालघर ,२०/०९/२०२० - विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्या साठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,पालघर विभाग तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे ,जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विक्रमगड पोलीस ठाणे या नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक तयार करून सदर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी दशरथ बाबल्या फडवले, वय १८ वर्षे, राहणार देहजें, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर, अजय संतोष पडवले, वय २० वर्षे राहणार इंदगाव फणसपाडा, तालुका विक्रमगड,जिल्हा पालघर यांना दि. १७/०९/२०२० रोजी अटक करून दाखल घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर आरोपींनी विक्रमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोसो व्हिला व्हिलेेज ,तालुका विक्रमगड येथील २ बंगले फोडून एलईडी टीव्ही,म्युझिक सिस्टिम,फँन असा एकूण ३४०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव ,विक्रमगड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
 
Top