जैन धर्मीयांची "क्षमावली" ही खूप उच्चत्तम शिकवण आहे .संस्कार आहे .या निमित्ताने मी आपणास व आपल्या परिवारास ,मित्रास ,वा सहकार्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ,जाणून बुजून वा आजाणतेपणे दुखावले असेल वा अपमानित केले असेल तर मी आपणा सर्वांचा क्षमस्वी आहे !!आपण मला क्षमा कराल हा माझा विश्वास आहे"!!
क्षमा....... ...

क्षमा हे वीरांचे लक्षण आहे
भूषण आहे, विलक्षण महत्वपूर्ण आहे
अमृततुल्य आहे !!

अनमोल आहे ,अर्थपूर्ण आहे
शक्तिशाली आहे ,ऊर्जा आहे ,संजीवनी आहे !!

संयम आहे,विनय आहे
विवेक आहे ,गौरव आहे !!

गोडी आहे ,सत्य आहे,सेवा आहे,अमरत्व आहे !!

 तिसरा डोळा :
डोळ्यांसमोर असावं पण डोळ्यांवर येऊ नये !!
चिंतन करावं पण चित्त विचलित करु नये !!

स्पर्धा असावी पण द्वेष करु नये !!
दया करावी वा मागावी पण दुबळ असू नये !!

स्तुती असावी पण स्तूत्य असावी !

स्वाभिमान अभिमान असावा पण 
अहंकार नसावा !!.

आत्मविश्वास असावा पण अतिरेक नसावा !!
सतर्क असावं पण संथ नसावं!!

उक्ति प्रमाणे कृती असावी 
पण नुसती वाचाळता नसावी !!

संयम असावा, पण शरणार्थी नसावं !!

शिक्षण असावं ,पण आळशी नसावं !!

आनंद कोठडीया,कृषीरत्न,
९४०४६९२२०० वादळ ,जेऊर (करमाळा)
जि .सोलापूर ,महाराष्ट्र 
Top