पंढरपूर नगरपरिषदेचे उपद्रवी प्राण्यांकडे दुर्लक्ष- सौ सुनेत्राताई पवार


पंढरपूर - गेले अनेक दिवसांपासून पंढरपूर शहर व उपनगरांमध्ये कुत्री व डुक्कर हे प्राणी सर्वत्र मोकाट फिरत असल्याचे व रस्त्यावर कोठेही बसल्याचे दिसत असूनही नगरपालिका त्याबाबत काहीच उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सोसावा लागत आहे. पंढरपूर शहर व विकसित भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. याने सर्व जनता भयभीत झालेली असतानाच दिवसभरात सोयीने नागरिक घराजवळच्या मोकळ्या जागेत, रस्त्यावर फिरत असतात. मोटरसायकलवरून नागरिक सतत ये-जा करीत असतात. अशा नागरिकांना या मोकाट प्राण्यांचा त्रास सोसावा लागत आहे. हे प्राणी अचानक अंगावर जातात, वाहनाच्या आडवे जातात यामुळे नागरिकांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे .

    त्यासाठी वेळीच अशा प्राण्यांचा पंढरपूर नगरपरिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत असल्याचे प्रदेश महिला कॉंग्रेस आय जनरल सेक्रेटरी सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार यांनी सांगितले. नगरपालिकेने मोठ्या अपघाताची वाट न पाहता वेळीच लक्ष देऊन नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी सौ सुनेत्राताई पवार यांनी केली आहे.
 
Top