पंढरपूर,(प्रतिनिधी)- मातंग समाज हा अतिशय गरीब असून पंढरपूर तालुक्यातील मौजे गुरसाळे येथे गेल्या २० ते २५ वर्षपासून येथे राहत आहेत. मौजे गुरसाळे या गावामध्ये मातंग समाज मंदिर ग्रामपंचायतने आजतागायत बांधलेले नाही.या ग्रामपंचायतीत अनेक वेळा मातंग समाजानी मागणी केली होती पण अजूनपर्यंत मातंग समाज मंदिर बांधले नाही.या समाजाला अनेक गोष्टीं पासून वंचित ठेवले जात आहे.

पंढरपूर माढा विधानसभा आमदार बबनराव शिंदे व सोलापूर जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे यांनी दि.०४०८२०१४रोजी प्रस्ताव आणि निधी उपलब्ध करून दिला होता.पण तो निधी गुरसाळे ग्रामपंचायतने मातंग समाज मंदिरासाठी वापरला नाही.आता चालूमध्ये मातंग समाज मंदिर बांधण्या साठी शासनाने निधी उपलब्ध केला आहे.तो निधी मातंग समाज मंदिरासाठी वापर करावा आणि मौजे गुरसाळे ग्रामपंचायतीने मातंग समाज मंदिर बांधून समाजला न्याय घ्यावा. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी पुर्णपणे रिकामी ठेवली जात आहे.त्या टाकीची दुरूस्ती करून गुरसाळे गावातील नागरिकांना पाण्याची सोय करावी.

   त्या पाण्याच्या टाकीशेजारी अनेक वर्षापासून अंगणवाडी आहे.ती अंगणवाडी पुन्हा सुरू करावी. या सर्व गोष्टी पंढरपूरचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी जातीने लक्ष घालून मौजे गुरसाळे ग्रामपंचायतील आदेश काढून मातंग समाज मंदिर व पाण्याची टाकी आणि अंगणवाडी शाळा दुरूस्ती करून घ्यावात.या सर्व मागण्याचा निर्णय योग्य नाही घ्यावा.शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने गटविकास उपअधिकारी पंचायत समितीचे श्री पिसे यांना निवेदन देण्यात आले आहे .या निवेदनाची दखल न घेतल्यास पंचायत समिती कार्यलयासमोर बेमुदत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,छावाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, बहुजन बिग्रेडचे नानासाहेब खंडागळे,ओ.बी.सी.सेलचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर,विशाल शिंदे,करण चवरे, अमरदिप लोखंडे आदींच्या उपस्थितीत देण्यात आला .
 
Top