पिंपरी चिंचवड - करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर या काळातील ३०० युनिटपर्यंतची वीज बिल माफ करून वरील शिल्लक युनिटवर सवलत देऊन, पुढील बिलामध्ये मासिक हफ्ते ठरवून टप्प्या टप्प्याने बिल आकारणी करून घ्यावी यासाठी भारतीय राष्ट्रवाद पार्टीकडून आंदोलन करण्यात आले.


निवेदनामध्ये म्हटले आहे की,करोना विषाणूच्या संकटात लॉकडाऊने सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.उद्योग,व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.या करोनाच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या लोनचे हप्तेही भरायचे आहेत अशा परस्थितीमध्ये महावितरण कडून भरमसाठ बिल आकारणी केली गेली. एकीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा याचा प्रश्न निर्माण झाला असताना आता वाढीव वीज बिलामुळे नागरिकांच्या डोकेदुःखीत भर पडली आहे,यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील वीज बिल माफी करावे, अन्यथा भारतीय राष्ट्रवाद पार्टीकडून तीव्र पद्धतीने आंदोलन केलीं जातील.


    याचे निवेदन महावितरण आकुर्डी विभागीय कार्यलय अभियंता श्री चौधरी यांना देताना महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख अजित संचेती, युवा प्रदेश उपाध्यक्ष संदीप गायकवाड,पुणे जिल्हा अध्यक्ष छाया राय, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष जगदीश मडाले, पिं. चिं महिला उपाध्यक्ष पूनम मोरे,पिं.चिं.युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके,युवा उपाध्यक्ष गिरीश पाटील,चिंचवड विधानसभा अध्यक्ष निमिष पळशीकर, तुषार जाधव,रोहन पांडे,सुमित गायकवाड व देहु रोडचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद सर उपस्थित होते.
 
Top