बिल जास्त आले असल्याने सर्वसामान्य जनता अडचणीत


पंढरपूर,(प्रतिनिधी) - पंढरपूर हे राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची उपजीविका ही येथे भरणाऱ्या यात्रेवर अवलंबून असल्याने तसेच गोरगरीब जनतेच्या हातावरील पोट असल्याने अशा लोकांना कोरोना विषाणूच्या महामारीने गेल्या सहा महिन्यापासून कामधंदा व उद्योग बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशातच नगरपालिका प्रशासनाने वाढीव घरपट्टी आकारली आहे. त्याचबरोबर भरमसाठ वीज बिल आले असल्याने सर्वसामान्य जनता अडचणीत सापडली असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आता अखिल भारतीय मराठा महासंघ सरसावले आहे.त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री सह प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना जनतेची घरपट्टी व वीज बिल माफ करावे असे आशयाचे निवेदन दिले आहे.

शहरातील नागरिकांची उपजीविका येथे भरणाऱ्या यात्रेवर अवलंबून असते परंतु चैत्री व आषाढी या दोन्ही यात्रा कोविड-१९ मुळे झाल्या नाहीत तसेच गेले सहा महिने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असल्याने व्यापार उद्योग अडचणीत आले यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशातच पंढरपूर नगरपरिषदेने वाढीव कर आकारला व कर भरण्यासाठी तगादा लावला . तसेच लाईट बिलसुध्दा वाढीव आले असून ते भरण्यासाठीसुद्धा वीज मंडळाकडून तगादा लावला जात आहे. यावर्षीची घरपट्टी कर माफ करावी तसेच लाईट बिल माफ करून सर्वसामान्यांना सरकारने व प्रशासनाने आधार द्यावा अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आज मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर,तहसीलदार वैशाली वाघमारे, प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांना देण्यात आल्या असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आले आहे.

सदरचे निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, उपाध्यक्ष सचिन गंगथडे, सचिव गुरुदास गुटाळ, तालुकाध्यक्ष संतोष जाधव ,शहराध्यक्ष अमोल पवार, संघटक काका यादव,पांडुरंग शिंदे,विद्यार्थी आघाडी प्रणव गायकवाड,महिला तालुकाध्यक्षा सौ रजनीताई जाधव, शहराध्यक्षा डॉ संगीता पाटील,प्रभावती गायकवाड, प्राजक्ता शिंदे, अश्विनी साळुंखे,रतन थोरवत,नागेश गायकवाड, हार्शद मोरे ,शिवाजी मोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top