कुर्डुवाडी,( राहुल धोका)- भुयारी गटाराचे काम पावसाळा काळात थांबवा अशी मागणी डाॅ विलास मेहता यांनी केली आहे. कुर्डुवाडी शहरात पाऊसळ्यात भुयारी गटाराचे काम चालु आहे त्या मुळे नागरीकाना मोठा त्रास होत आहे. या बाबत विविध राजकिय पक्ष व पक्षातील पदाधिकारी यांना निवेदन दिली मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

     भुयारी गटाराचे काम पावसाळा काळात थांबवा या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून सतत मार्गदर्शक भुमीका घेणारे डाॅ विलास मेहता यांनी नगराध्यक्ष समिर मुलाणी यांना नगर रचना विभाग व संबधित ठेकेदार यांना सक्त ताकिद देवून, नगरपालिका प्रशासन, नागरी समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे .

      यंदा पाऊसाचे प्रमाणहि अधिक आहे यात शहराचे ब्रँड अँबेसिडर मानले जाणारे डाॅ विलास मेहता यांनी काम करताना नागरिकांना त्रास होवू नये यासाठी उपाय योजना करण्यास सांगितले आहे.सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कुर्डुवाडी व्यासपिठ न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

    सदरची भुमिका सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का मानला जात असून व्यासपीठाने नगरपरिषद कार्यालयामध्ये समस्या मांडण्यास सुरवात केल्यास सत्ताधारी पक्षाची मोठी अडचण होणार असली तरी व्यासपिठाच्या मागणीमुळे नागरिकांची समस्या सुटणार असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

 सदरचे भुयारी गटाराचे काम वर्षानुवर्ष पडून होते यासाठी आलेल्या निधीचा वापर करुन हे काम पुर्ण करणे गरजेचे आहे मात्र नागरिक समस्या सोडवण्यासाठी योग्य भुमिका नगरपरिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे
 
Top