कुर्डुवाडी
,(राहुल धोका) ,२१/०९/२०२०-राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी सुधीर गाडेकर यांची निवड झाली आहे.अनेक वर्षापासून नाभिक चळवळीत स्वतःला  झोकुन देऊन काम केले असून राज्यभरातील युवकांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला आहे.समाजाच्या विविध आंदोलनात सहभागी होऊन यशस्वीपणे कार्य केलेले आहे,

  कुर्डुवाडी शहर नाभिक असोशिएनच्या अध्यक्ष पदापासुन सोलापुर जिल्हा युवक अध्यक्षपदाची धुरा यशस्वी पार पाडलेल्या सुधीर गाडेकर यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अरुण जाधव यांनी केल्याने सामाजिक भान व जाण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वास अखेर न्याय मिळाला आहे,अशी समाजात भावना निर्माण झाली आहे .

विविध महापुरुष जयंती पुण्यतीथी सामाजिक ऊपक्रम करुन साजरी  करणे, रक्तदान,स्वच्छता अभियान,वंचीत घटकाला मदत करणे,शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे, आरोग्य विषयी लोकांना मदत,सोलापुर से.स फंडातुन नाभिक बांधवांना सलुन साहित्य खरेदी  
(जपानी खुर्ची) १००% अनुदान ही योजना त्यानी समाजाला मिळवुन दिली.

   हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे यांच्या धामणगाव येथील स्मारकासाठी निधी खेचून आणण्यासाठी सुधीर गाडेकर यांचे महत्वाचे योगदान आहे.
 
Top