कुर्डुवाडी,(राहुल धोका),दि २४/०९/२०२०- कुर्डुवाडी नगरपरिषद येथे समीर भुमकर यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शहरास होणार आहे .मुख्याधिकारी समीर भुमकर हे यापूर्वी आळंदी नगरपरिषद येथे कार्यरत होते. तेथील अनुभवाचा फायदा कुर्डुवाडी शहराला होणार आहे. 

कुर्डुवाडीतील कोरोना कंट्रोल करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी

कुर्डुवाडी शहरातील कोरोना कंट्रोल करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असून माझॆ कुटुंब माझी जबाबदारी ही योजना शहरात प्रामुख्याने राबवली जाणार आहे. शहरात मास्कची सक्ती करण्यात आली असुन दंडाची आकरणी केली जात आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. शहरात सध्या भुयारी गटारांमुळे नागरिकांना त्रास होत असून याबाबत ठेकेदारास काम करताना बॅरीकेट लावणे, साईन बोर्ड लावावे अशा सुचना दिल्या असून सदर सुचना न पाळता काम सुरु राहिल्यास काम बंद केले जाईल असेही त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
 
Top