मराठा समाजाने दिली जिल्हा बंदची हाक

कुर्डुवाडी,(राहुल धोका),२०/०९/२०२०- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षासाठी स्थगिती दिल्यानंतर आरक्षण आंदोलनचे लोण पुन्हा पसरताना दिसत आहे.

     उद्या सोमवार दि २१/०९/२०२० रोजी मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली असून व्यापारी वर्गाने त्यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन साम्राज्य आरमारचे संस्थापक उमेश पाटिल ,भक्ति सामाजिक संघटनेचे हरिश भराटे ,ओम राजे सामाजिक संस्थेचे संदिप भराटे व मराठा समाजा कडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

  शहर परिसरातील व्यापारी वर्ग नेहमीच मराठा समाजाच्या बाजूने राहिला असून समाजातील अनेक लोक आजहि कामगार म्हणून काम करतात या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने व्यापारी वर्ग सहभागी होणार असल्याची माहिती शहर किराणा व्यापारी असोशियनचे अध्यक्ष राजकुमार धोका यानी दिली आहे. 

  उद्याच्या अंदोलनामुळे सर्व बस सेवा बंद राहणार असल्याची माहिती कुर्डुवाडी आगार प्रमुख मिथुन राठोड यानी दिली.

  उद्या मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी बंदची हाक दिली असून परांडा चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक चिमणराव केंद्रे यांनी दिली आहे. 
 
Top