कृषी संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार 

पंढरपूर : कृषी पदवीधर संघटनेच्या सोलापूर जिल्हा विद्यार्थी संघटकपदी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील ज्ञानेश्वर रावसाहेब कदम यांची निवड झाली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांच्या आदेशाने व संघटनेचे सुमित धामणे  पाटील, मनिष भदाणे पाटील, संग्रामसिह बुचडे, प्रकाश यादव, ऋषिकेश देशमुख, आदित्य बंडगर आदींच्या शिफारशीने ज्ञानेश्वर कदम यांची निवड करण्यात आली. 

   या माध्यमातून जिल्ह्यातील पदवीधर, विद्यार्थी, युवक, कृषीशी निगडीत असणाऱ्या घटकांच्या समस्याचा पाठपुरावा करणे, कृषीवलांचे संघटन करणे, कृषी प्रगतीस प्रोत्साहन देणे या स्वरूपाचे कार्य होणार आहे.या पदाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील कृषी संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटन करून कृषी उपक्रम राबिणार आहे. यासाठी संघटनेतील वरिष्ठांचे मार्गदर्शन व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेलच,असे ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले.
 
Top