विकास पाटील यांची विशेष संकल्पना यशस्वी

पंढरपूर ,(विजय काळे)-सोलापूर जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रात, देशात तर आता संपूर्ण संगीत जगतात संगीत शिक्षणासाठी सर्वोच्च ठरलेल्या कलापिनी संगीत विद्यालय,पंढरपूर यांनी ६ जून २०२० सूरू केलेल्या “ कलापिनी फेसबूक लाईव्ह जागतिक संगीत महोत्सव २०२०" यास मंगळवार दि १५ सप्टेंबर रोजी १०० दिवस पूर्ण होत आहेत.
यामध्ये आजपर्यंत एकुण १२० कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे,अशी माहिती संस्थेचे प्राचार्य दादासाहेब पाटील यांनी दिली.

आदर्श संगीत शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांच्या संकल्पनेत साकार झालेल्या या महोत्सवात श्रीकांत फाटक बडोदा,सुधीर काळे पुणे,जिनय छेडा मुंबई ,जय कराड जालना, पॉली वर्गीय चेन्नई ,अतुल कांबळे पुणे,अविनाश पाटील पुणे, दादासाहेब पाटील पंढरपूर,अमेय देशपांडे सातारा,महेश केंगार पुणे,सचिन पावगी पुणे,रोहित गडकर पुणे,दिपक दाभाडे कोल्हापूर ,अथर्व कागलकर पुणे,मयुर जोशी सांगली ,डॉ.अविराज तायडे नाशिक,डॉ.हेरंबराज पाठक अक्कलकोट,
श्रीदत्त प्रभू मेंगलोर, कर्नाटक ,कल्याण देशपांडे रायबाग ,मयुरेश शिखरे कोल्हापूर,पंडिता पद्मिनी राव बेंगलोर,यश सोमण पुणे,ओंकार पाठक अक्कलकोट ,अथर्व बेलसरे जेजूरी,आर्यन मोकाशे दुबई,सोहम पत्की अमेरिका,मदन ओक अमेरिका ,जसबीर सिंह पंजाब,धनुश गायकवाड नायजेरिया
वृशाली भणगे पुणे,समृद्धी मित्र ओडिसी ,बेंगलोर
ऋषिकेश भावे पुणे,प्रितम वाडेकर बार्शी , महेश साळुंखे पुणे,आश्विनी पाटील चंदगड,अमोद दंडगे कोल्हापूर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे. विशेष बाब म्हणजे आणखी काही दिवस हा महोत्सव चालावा या साठी अनेक कलाकार स्वखुशीने सहभाग घेत आहेत.

जगभरातील अनेक कलाकार सहभागी

कोरोना महामारीत संपूर्ण विश्व थांबले असताना संगीत जगतात मात्र हि शांतता होऊ नये व घरी बसून सर्वांना उच्चस्तरीय संगीत तेही निशुल्क ऐकता यावे यासाठी विकास पाटील यांनी राबवलेली हि संकल्पना आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. श्री. दादासाहेब पाटील, अविनाश पाटील व विकास पाटील हा संपूर्ण परिवार यासाठी निरंतर प्रयत्न करित आहेत.
 
Top