ग्रामीण कृषी जागरूकता आणि कार्यानुभव कार्यक्रम

कुर्डुवाडी,(राहुल धोका) - माढा तालुक्यातील जामगाव या गावामध्ये ग्रामीण कृषी जागरूकता आणि कार्यानुभव कार्यक्रम २०२०- २१ अंतर्गत कृषी महाविद्यालय कोल्हापूर आणि कृषी महाविद्यालय कराड येथिल कृषीदूत प्रतिक पाटील विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

बीज प्रक्रिया,लागवड पद्धती,माती परिक्षण तसेच आधुनिक शेती यांसारख्या महत्वाच्या घटकांचे मार्गदर्शन येथील शेतकर्यांना करण्यात आले. कृषीदुतांच्या या शास्त्रीय प्रात्यक्षिके सल्ल्याचे शेतकऱ्यांना खूप फायदा झाल्याचे शेतकर्‍यां कडून सांगण्यात येत होते .

यासाठी त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम समन्वयक,कार्यक्रम अधिकारी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
 
Top