शेळवे परिसरात कासाळ ओढ्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान


शेळवे,(संभाजी वाघुले)-गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे कासाळ ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या कासाळ ओढ्याला मागील २० वर्षात असे पाणी या ओढ्याला कधीच आले नव्हते.

या पाण्यामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.उस,मका,केळी,शेवगा,पेरु अशी अनेक पिके पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेली आहेत. पिका सोबतच या परिसरात असलेले विद्युत वाहक पोल व डिपीही जमिनदोस्त झाले आहेत.


या कासाळ ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक शेतकर्यांच्या विद्युत मोटारी ,पाईपा ,पिके व भलीमोठी झाडेही वाहून गेली आहेत.या कासाळ ओढ्याच्या पाण्यामुळे ओढ्यालगत असणाऱ्या शेतातील माती वाहुन जाण्याने शेतकरी पुरता खचुन गेला आहे. हे नुकसान भरुन न येणारे आहे.
कासाळ ओढ्यालगतच्या सर्व नुकसाणीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.


शेळवे येथील देवचंद मच्छिद्र गाजरे यांच्या शेतातील छायाचिञे
 
Top