आषाढी वारी तर गेलीच...! सौ.दुर्गाताई माने यांची गोरगरीब व्यवसायिकासाठी मागणी 

  पंढरपूर,प्रतिनिधी - मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या या संकटामुळे सर्वच ठिकाणच्या मंदिरात प्रवेश बंद आहे. त्यामुळे कोणीही बाहेर कुठेही जात नव्हते, त्यामुळे सर्व दळणवळण आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. या कालावधीत पंढरपूर वासीयांचे जीवन अवलंबून असणारी आषाढी वारी पार पडली नाही. यामुळे येथील लोक अडचणीत सापडले आहेत.तरी या सर्वच गोष्टीची भरपाई होण्यासाठी आगामी अधिक महिन्यात तरी मंदिरे खुली करून जीवन जगु द्या अशी मागणी दुर्गाताई माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

     कोरोना हा भयानक आहे याची कल्पना आता सर्वांना झाली आहे.परंतु भूकबळी त्याहूनही वाईट आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींचा सारासार विचार करून योग्य ती नियमावली आखून लवकरच मंदिरे खुली करून कोलमडलेली अर्थव्यवस्था परत एकदा सुरू करावी अशी मागणी दुर्गाताई माने यांनी केली आहे.
बचतगटवाल्यांना इशारा....
महिलांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज देताना विमा रक्कम काढून घेण्यात येत असते. सध्या या मोठया आपत्तीमध्ये विमा लागू करून ती कर्ज माफ करून, नव्याने व्यवसाय करण्यासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरु करावी.वसुलीसाठी महिलांना त्रास दिल्यास आम्ही महिला कायदेशीर मार्गाने मार्ग काढू असा गंभीर इशाराही पंढरपूरच्या समाजसेविका दुर्गाताई माने यांनी दिला आहे.
    या महिलांनी बचतगट माध्यमातून मायक्रो फायनान्स आणि बॅंक कडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेले असतात.या कोरोनाच्या परिस्थितीत व्यवसाय बुडाले आणि यामधील आर्थिक भांडवल शिल्लक राहिले नाही. त्यामुळे सध्या त्या महिलाना हप्ता भरणे कठीण झाले आहे.बचतगट हप्ते वसुल करणारे दारोदार चकरा मारू लागले आहेत, या कठीण संकटात शासनाने व्यवसाय सुरू होण्या साठी मंदिरे खुली करावीत .तसेच लॉकडाऊनच्या काळात जी आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. त्यांना छोटे भांडवल पुरविण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणीही समाजसेविका दुर्गाताई माने यांनी केली आहे.
 
Top