मुंबई दि.११/०९/२०२० - सांगली जिल्ह्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे ग्रामीण जनतेची सेवा करणारे; ग्रामीण भागा तील जनतेचे प्रश्न सोडविणारे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत बाबासाहेब कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिवंगत बाबासाहेब कांबळे हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा गावचे रहिवासी होते. भारतीय दलित पँथर पासून माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते होते. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगलीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत त्यांनी केले. बाबासाहेब कांबळे यांच्या सारखे  अत्यंत प्रामाणिक; विश्वासू एकनिष्ठ कार्यकर्ते दुर्लभ असतात. त्यांचे  काल अचानक हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रामाणिक कार्यकर्तृत्वाचा भीमसैनिक हरपला असून सांगली जिल्ह्याचीही मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली. 
 
Top