त्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर योग्य निर्णय


नवी दिल्‍ली,PIB Mumbai,१६ सप्‍टेंबर २०२०-
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सरकारने अनुक्रमे २६.०६.२०१० आणि १९.१०.२०१४ पासून बाजार निर्धारित केल्या आहेत. तेव्हापासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (ओएमसी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किंमती,विनिमय दर,कर संरचना,अंतर्देशीय माल वाहतूक आणि इतर किंमती घटकांच्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर योग्य निर्णय घेतात.

सुधारित गुणवत्तेच्या मापदंडांव्यतिरिक्त गंधकाची कमी मात्रा (१० पीपीएम कमाल) असलेले बीएस-VI हे उच्च दर्जाचे इंधन आहे अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. बीएस-VI इंधनाच्या उत्पादनात भारतीय तेल शुद्धीकरण करणाऱ्यांसाठी मोठी गुंतवणूक अंतर्भूत आहे. गुंतवणूक खर्चाच्या अंशतः भरपाईसाठी ०१.०४.२०२० पासून किमतीमध्ये त्यानुसार बदल करण्यात आला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
 
Top