बजाज फायनान्सच्या मनमानी कारभाराबाबत due to BAJAJ finance so many people 


  पंढरपूर - covid-19 चा रोगामुळे महाराष्ट्रा बरोबर भारत देशातही आर्थिक बाजू कोलमडली असून सर्वसामान्यांना दोन वेळेस जेवणाचीही अडचणी येत आहेत अशातच बजाज फायनान्स मात्र ज्या लोकांनी बजाजकडून पर्सनल लोन किंवा मोबाईल घेतले आहेत अशा लोकांना सतत हप्त्यासाठी व दंडासाठी फोन करून त्रास देत आहेत .

   पंढरपुरातील परिस्थिती अतिशय बिकट आहे . पंढरपुरातील जे लोक व्यवसाय करतात तो व्यवसाय पूर्णतः मंदिराच्या जीवावर चालतो त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सध्या बिकट आहे. बजाजचा ईमआय भरण्याची त्यांची परिस्थिती नसून त्यांना भरण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा तरीसुद्धा बजाज फायनान्स कर्मचारी भाडेतत्त्वावर वसुली करणारे या गोरगरीब लोकांच्या घरी जाऊन किंवा फोन करून उद्धट भाषेत बोलताना आढळतात .अशामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

     तरी प्रशासनाने यामध्ये जातीने लक्ष घालून ईमआय हप्ता बजाज फायनान्सला सांगून वेळ वाढवून घ्यावी अन्यथा येत्या २० तारखेला बजाज फायनान्सला टाळे ठोकून तळ ठोकून त्याच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रांताधिकारी पंढरपूर यांना शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे,पंढरपूर शहराध्यक्ष माऊली चव्हाण, शहर प्रसिद्धीप्रमुख रणजीत सावंत,शहर उपाध्यक्ष विकी काळे, शहर संघटक मंगेश श्रीखंडे. ज्ञानप्रसाद शेटे व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले . 
 
Top