पंढरपूर – दि.१५.०८.२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप शिवलाल शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार गणेश वाळके, माजी नगरसेवक तुकाराम राऊत आदी उपस्थित होते.


 दिलीप शहा यांचे हस्ते ध्वजपूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गाऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली . 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसींगचे सर्व नियम पाळत निमंत्रीत पालकांच्या उपस्थितीत  स्वातंत्र्यदिन प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री काळे यांनी केले.यावेळी  प्रशालेचे शिक्षक श्री गावडे, श्री डुणे, श्री सावंत, सौ प्रियांका टीचर, भाग्यश्री टीचर, सौ प्रज्ञा टीचर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top