पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील पर्यायी कल्पनांसाठी देशात नाविन्यपूर्ण भावना रुजवण्याची आवश्यकता, ज्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी

PIB Mumbai २७/०८/२०२०- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी म्हणाल्या की, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील पर्यायी कल्पनांसाठी देशात नाविन्यपूर्ण संशोधनाची भावना रुजवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात प्लॅस्टीक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित केलेल्या टेक्सटाईल ग्रँड चॅलेंज २०१९ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाल्या, स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी केलेले नाविन्यपूर्ण कल्पनांचे योगदान हा भारताच्या सर्वांना समान संधीच्या वारसाचे प्रतिक आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून प्लास्टिक पिशव्या टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्या उद्देशाने नाविन्य पूर्ण कल्पना पुढे आणण्यासाठी टेक्स्टाईल ग्रँड चॅलेंज 2019 च्या ग्रँड फिनालेचे आयोजन
स्मृती इराणी यांनी वस्त्रोद्योग मशीन तंत्रज्ञानास विशेषत: ज्यूट क्षेत्र अद्ययावत करण्यावर भर दिला आणि नवीन तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ग्रँड मशिनरी चॅलेंज आयोजित करण्याच प्रस्ताव मांडला.
स्पर्धेत एकूण ६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी एकूण तीन सहभागितांना, यात २ - एकाचवेळी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय आणि १- बहुवापर प्लास्टिक पिशव्यांना पर्याय यांना मंत्रालयाकडून रोख पारितोषक प्रदान करण्यात आले. विजेत्यांमध्ये मेसर्स अवेगा ग्रीन टेक्नॉलॉजीस, पुणे; मेसर्स धृती बायो सोल्युशन्स म्हैसूर आणि मेसर्स शक्ती नॉनओव्हनस, चेन्नई यांचा समावेश आहे. यांनी ज्यूट स्टार्च आधारीत किराणा सामान आणि इतर खरेदीसाठी उपयुक्त ठरतील अशा कमी वजनाच्या पिशव्या तयार करण्यासाठी मांडलेल्या कल्पना अद्वितीय आणि नावीन्यपूर्ण आहेत.

कार्यक्रमासाठी वस्त्रोद्योग सचिव रवी कपूर यांचीही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती होती. कार्यक्रमात वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता.

वस्त्रोद्योग सचिव रवी कपूर यांनी माहिती दिली की,स्मृती झुबिन इराणी यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय राष्ट्रीय स्तरावरील प्राधिकरणाला मान्यता देत आहे, जे ज्यूट,फ्लॅक्स,रमी,हेम्प,सिसल, केळी या नैसर्गिक फायबरचा आवश्यक विकास आणि संवर्धन करुन प्लास्टीकला पर्याय तयार करेल.

ते म्हणाले, पुरस्कारामुळे नवीन स्टार्ट अप्सला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आर्थिक पाठबळ , त्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने नामवंत उद्योजकांना आवाहन केले की, नवीन कल्पना आणि तंत्रज्ञान पुढे न्यावे आणि जैव विघटनशील , अप्रदुषणकारी पिशव्यांचे उत्पादन करावे यामुळे नव्या स्टार्ट-अप्सला प्रोत्साहन मिळेल आणि नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध होईल
 
Top