अध्यक्षपदी नामदेव कागदे तर उपाध्यक्षपदी अशोक भोसले

 पंढरपूर ,दि.०३/०३/२०२० - गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव सावळाराम कागदे यांची तर उपाध्यक्षपदी अशोक लक्ष्मण भोसले यांची गोपाळपूर येथे श्री.विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये झालेल्या साधारण बैठकीमध्ये निवड एकमताने करण्यात आली. 

   यावेळी मावळते अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष नामदेव कागदे यांचा तर मावळते उपाध्यक्ष आर.बी.रिसवडकर यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्ष अशोक भोसले यांचा सत्कार करण्यात आला. 

   स्वेरीच्या पंधरा विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात सातत्याने 'पंढरपूर पॅटर्न'च्या माध्यमातून नवीन प्रयोग करत असताना यशाची  नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. आज नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी पदभार हाती घेतला. अध्यक्ष नामदेव कागदे हे बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध  कॉन्ट्रॅक्टर आहेत तर उपाध्यक्ष अशोक भोसले हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. 

    या सत्कार प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
 
Top