ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना 'मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा', 


        पंढरपूर, १७/०८/२०२०- कोरोनाने कहर करत सर्वसामान्यांसह राज्यातील अनेक दिग्गजांना विळखा घातला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक  यांच्यासह परिचारक कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राजकारणातील संत सुधाकरपंत अशी ओळख असणारे परिचारक सध्या पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यामुळे सुधाकपंत यांचे नातू प्रितीश परिचारक यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन सोशल मीडिययावरून केलं आहे.

आजोबांसाठी प्रार्थना करा - प्रितीश पारिचारक यांचे आवाहन 

    माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांची प्रकृती चिंताग्रस्त असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहे. तर आजोबांसाठी प्रार्थना करा असं आवाहनही प्रितीश पारिचारक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.

'गेल्या काही दिवसांपासुन पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व COVID विलगिकरण कक्षामध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.

   पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून माजी आमदार सुधाकरपंत परिचारक  यांच्यावर सर्वोत्तम उपचार चालू आहेत. साखर आणि रक्तदाब यासारखे आजार , वृद्धापकाळ  आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत चालली आहे. गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाई ही जिंकतील अशी आशा करूयात.
 
Top