सर्वांनी धीर धरावा, संयम बाळगावा- परिचारक कुटुंबाचेवतीने विनंती


पंढरपूर - राजकारणातील संत सुधाकरपंत अशी ओळख असणारे पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे काल दि. १७/०८ /२०२० रोजी रात्री ११.३५ वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले.कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचा अंत्यविधी पुणे येथील वैकुंठभूमी येथे दि.दि.१८/०८/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता करणेचा निर्णय परिचारक कुटुंबियांनी घेतला आहे.

शासकीय नियमानुसार २५ लोकात अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी धीर धरावा, संयम बाळगावा हि विनंती परिचारक कुटुंबाचे वतीने आ प्रशांत परिचारक,उमेश परिचारक, प्रणव परिचारक यांनी केली आहे .

  श्री.रुक्मिणी पांडुरंग त्यांचे आत्म्यास शांती देवो..
परमेश्वराच्या इच्छाशक्तीपुढे कोणाचेही चालत नाही, परमेश्वराने दाखविलेल्या मार्गावरच पुढे जावे लागते.फडे परिवार आणि ज्ञानप्रवाह न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली ...
 
Top