भंडीशेगाव येथे तेजस पाईप कंपनीस आमदार सुभाष देशमुख यांची भेट

     भंडीशेगाव ,ता.पंढरपूर - येथील तेजस ऍग्रो इरिगेशन सिस्टीम या कंपनीस माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन संपूर्ण कंपनीची पाहणी केली.

     याच भागातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम केले 

   ग्रामीण भागात शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेतीशी निगडित व्यवसाय भंडीशेगावच्या माळ रानावर उभा करून याच भागातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम तेजस पाईप कंपनीने केले असून याचा आदर्श घेऊन आपले गाव समृद्ध करावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

  तेजस पाईप कंपनीमध्ये शेतीविषयक लागणारे सर्व साहित्य तेजस कंपनी सर्व मानांकन प्राप्त बनवते अशी माहिती कंपनीच्या डायरेक्टर शुभांगी माडगूळकर यांनी दिली .

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संकल्पनेतून समृद्ध करण्यात येणार

 भंडीशेगाव हे गाव सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संकल्पनेतून समृद्ध करण्यात येणार असून गावात सर्वत्र वृक्ष लागवड करून गाव हरितग्राम बनवले जाईल,गाव समृद्ध करताना राजकारण विरहित काम करून सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्रित करून गावचा विकास तरुणांनी करावा असे मत उद्योजक अजित कंडरे यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संकल्पनेतून 14 एकर माळरानावर वृक्षारोपण करण्याचे आयोजन असून या वृक्षारोपनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वृक्ष लागवडसाठी आमदार सुभाष देशमुख आले होते.
भंडीशेगाव येथे लवकरच लोकमंगल बँकेचे सेवा केंद्र सुरू करून गाव समृद्ध बनवण्यासाठी परिसरातील तरुणांना,बचत गटांना,महिला व्यावसायिकांना कमी कागदपत्र व तत्पर सेवा देण्यासाठी लोकमंगल बँकेचे सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे अजित कंडरे यांनी सांगितले.

    मागील वर्षीचा उत्कृष्ट पोलीस सेवा कार्याबद्दल  राष्ट्रपती पदक मिळल्याबद्दल गणपतराव माडगूळकर यांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांनी केला.

      यावेळी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक अजित कंडरे,अमित इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजचे चेअरमन बाळासाहेब लोकरे,डॉ.अनिल कंडरे, मोहन अनपट,निशांत माडगूळकर,उपसरपंच संतोष ननवरे,ग्रामपंचायत सदस्य सतीश रणखांबे, ज्ञानेश्वर गिड्डे,विश्वास सुरवसे,प्रशांत वाघमारे, साधना गिड्डे,हसीना शेख, सचिन येलमार, डॉ. श्रीधर येलमार आदी उपस्थित होते.
 
Top