आर्सेनिक अलबम -३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

  भाळवणी,(प्रशांत माळवदे) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी गटातील जैनवाडी, धोंडेवाडी,शेंडगेवाडी, केसकर वाडी,सुपली,गार्डी, लोणारवाडी येथे शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यावतीने आर्सेनिक अलबम -३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

   यावेळी शिंदे म्हणाले, सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पंढरपुरसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण वाढत आहेत. या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होत आहे.यावेळी भाळवणी १८००,जैनवाडी५०० कुटुंब ,धोंडेवाडी८००, शेंडगेवाडी ३२५, केसकरवाडी ४५०,सुपली ४५०, गार्डी ७००, लोणारवाडी २५० कुटुंबाना गावातील आशा,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने या गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.

  यावेळी बाळासाहेब यलमर,बाळासाहेब पाटील, बी वाय ऍग्रोचे चेअरमन बाळासाहेब यलमर, सुधाकर माळी,आप्पा मासाळ, माऊली केसकर, तानाजी केसकर,संजय मासाळ,दिपक जमदाडे, सरपंच जनार्दन शेंडगे, प्रदीप खांडेकर, शांताराम यादव,शिवकुमार फाटे,समाधान मोरे,सोमनाथ निबाळकर,बाळासाहेब इनामदार,पांडुरंग वाघमारे, विठोबा गोडसे, महेश इंगोले,बबन साठे ,ग्रामसेवक एन एस बनसोडे,एस बी बडेकर,एस एम शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top