वीर सेवादलातर्फे प पू १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज ६५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ऑनलाइन खुल्या सह महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

   

२० व्या शतकातील प्रथमाचार्य,गुरुणांगुरु,चारित्र चक्रवर्ती,समाधीसम्राट प पू १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या ६५  व्या पुण्यतिथी महामहोत्सवानिमित्त वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने ऑनलाइन खुल्यासह महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत .

या स्पर्धेचे विषय आहेत - १) आचार विचारांचे दीपस्तंभ प्रथम आचार्य श्री शांतिसागर जी , 
२) नैसर्गिक आपत्ती काळातील देवदूत सेवाव्रती,
३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य,  ४) बळीराजा दशा व दिशा 

   यासाठी पारितोषिके प्रथम क्रमांक - तीन हजार एक रुपये- श्री विजय दादा आवटे अमृत महोत्सव गौरव समिती यांचेकडून 

  द्वितीय क्रमांक २००१/- वात्सल्यमूर्ती प.पू.१०५ कोमलश्री माताजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री भरत शंकरराव गाट , हुपरी यांचेकडून 

   तृतीय क्रमांक १००१/- वात्सल्यमूर्ती प.पू.१०५ कोमलश्री माताजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री भरत शंकरराव गाट हूपरी यांचेकडून ठेवण्यात आले असून या स्पर्धा ऑनलाईन आहेत. या स्पर्धेसाठी आपल्या भाषणाची व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हाट्सअप नंबर 72 72 92 1008 वर पाठवणे. भाषण करताना धार्मिक ,संप्रदाय, जातीय, तिरस्कार, लैंगिक शोषण, अवमानकारक घटना, संकल्पना अपशब्द विचार या भाषेचा वापर करता येणार नाही ,केल्यास भाषण स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार नाही. ही स्पर्धा ऑनलाइन असल्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था स्पर्धकांनी करण्याचे आहे ,तरी या स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन वीर सेवादल मध्यवर्ती समितीच्यावतीने चेअरमन शशिकांत राजोबा,व्हाईस चेअरमन भूपाल गिरिमल,सेक्रेटरी एन जे पाटील,जॉईंट सेक्रेटरी डॉ रावसाहेब कुन्नुरे , मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी केले आहे.

वीर सेवा दलाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी संपर्क करा - फोन:0233-2622803
 
Top