सुधाकरपंत परिचारक यांच्या रुपाने जुन्या पिढीतला जेष्ठ मार्गदर्शक हरपला- चेअरमन कल्याणराव काळे

भाळवणी,दि.२१/०८/२०२०- सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष राजुबापू पाटील यांचे तसेच भोसेचे बाळासाहेब कोरके यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले.त्यांना सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना परिवाराच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर श्रध्दांजली वाहण्यात आली.

प्राणघातक कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकर पंत परिचारक ,राजुबापू पाटील यांच्या निधनाने सहकार,राजकीय,सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतीक, शेक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच जनसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सहकार शिरोमणी परिवाराशीही या दोघांचे चांगले ऋणानुबंध होते. त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी कारखाना कार्यस्थळा वर कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवाराच्यावतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, माजी संचालक इस्माईल मुलाणी, निशिगंधा बँकेचे व्हाईस चेअरमन आर.बी.जाधव, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांनी आपल्या मनोगतात सुधाकरपंत परिचारक व राजुबापू पाटील यांच्या कार्याला उजाळा देवून श्रद्धांजली वाहिली. प्रारंभी कल्याणराव काळे यांच्या हस्ते सुधाकरपंत परिचारक आणि राजूबापू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवर, कारखान्याचे सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

प्रास्ताविक कारखान्याचे सेक्रेटरी एम.आर. मदारखान यांनी केले. उपस्थितांचे आभार बाळासाहेब कौलगे यांनी मानले. समाधान काळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धांजली सभेस कारखान्याचे संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, दिनकर चव्हाण, भारत कोळेकर, अॕड. तानाजी सरदार ,युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, माजी संचालक पांडुरंग कौलगे, राजसिंह माने, महादेव देठे , शहाजी पासले,दीपक गवळी,शिवाजी मदने, एमएससी बँकेचे प्रतिनिधी आर. एस. पाटील,श्रीविठ्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, जिल्हा परिषद मा.सदस्या सुरेखा लोखंडे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार,यशवंतराव पतसंस्थेचे माजी संचालक लक्ष्मण नलवडे, मुस्तफा बागवान, भाळवणीचे उपसरपंच अंबादास कुचेकर, धोंडीराम शिंदे, माजी उपसरपंच दाऊदभाई मुलाणी, तानाजी केसकर, नारायण शिंदे, निलेश काळे, निशिगंधा सह.बँकेचे व्यवस्थापक कैलास शिर्के,श्रीराम शिक्षण संकुल प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक, कारखान्याचे वर्क्स मँनेजर जी.डी.घाडगे, शेतीआधिकारी पी.जी.शिंदे, को-जन मँनेजर ए.बी.गाजरे,सिव्हिल इंजिनियर एन.एम.काळे, परचेस आँफिसर चंद्रकांत कुंभार,डेप्यु.चिफ केमीस्ट विजय सावंत, कार्यालय अधिक्षक.सी. एस.गायकवाड, गोडाऊन किपर के.जी.जाधव, केनयार्ड सुपरवायझर डि.डि.काळे,सभासद शेतकरी,वाहन मालक उपस्थित होते.
 
Top