१ लाख ८६ हजारचा ९०० दंड वसुल- उपविभागीय पोलीस अधिकारी कवडे
    पंढरपूर दि.१३/०८/२०२० - पंढरपूर तालुक्यात शहरासह कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या सतत वाढत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात दि.०७/०८/२०२० पासून संचारबंदी  घोषीत केली आहे. संचारबंदी सूरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या ८३९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या कडून  विविध कारवाईत १ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे.

       कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजन करण्यात आल्या  आहेत. संचारबंदीच्या पहिल्याच दिवसां पासून शहरात कडक अंमलबजावणी सुरु केली आहे.शहरात संचारबंदी कालावधीत हॉस्पिटल व मेडीकल,दूध या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.पोलीस प्रशासना कडून आवाहन करण्यात आले होते. तरीही नागरिक विनाकारण घराबाहे पडत आहेत.

    शहरात  संचारबंदीच्या ०७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत मास्क न वापरणे, दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे, चार चाकी वाहनांत तीन पेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे,ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान उघडे ठेवणे, दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणे आदींमुळे कारवाई करण्यात आली आहे .

    संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विना कारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई  करण्यात येईल,असा इशारा डॉ.सागर कवडे यांनी दिला आहे.
 
Top