सुपा येथील बलात्काराची घटनेतील कुटुंबावर झालेल्या हल्ल्यातील पिडीतेचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात यावा ... आ.डॉ.नीलम गोऱ्हे

नगर, दि.१७/०८/२०२० - नगर जिल्ह्यातील सुपा येथील फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर जीवघेणा हल्ला दि.१४ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात आला होता. याबाबत शिवसेना प्रवक्त्या तथा स्त्री आधार केंद्रच्या अध्यक्षा आ. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून या केसचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आ.डॉ.गोऱ्हे यांनी पीडित मुलीवर उपचार डॉ विजय जगताप यांना दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना मुलींच्या तब्येतीबद्दल चौकशी करून उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल विचारपुस केली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर जिल्हाधिकारी श्री.द्विवेदी यांच्याकडे निवेदन देऊन मुलीच्या उपचाराची व्यवस्था शासनाच्या योजनेतून करण्याची विनंती केली आहे.

मुलीच्या संरक्षणासाठी महिला पोलीस कर्मचारी नेमण्याची सूचना

सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना संपर्क करून मुलीच्या संरक्षणासाठी महिला पोलीस कर्मचारी नेमण्याची सूचना केली. याचबरोबर सुपा,नगर शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबाना औषधासाठी आर्थिक मदत आ.डॉ.गोऱ्हे यांच्या आदेशानुसार तालुकाप्रमुख विकास रोहोकाळे यांनी केली आहे. पीडित कुटुंबाशी आ.डॉ.गोऱ्हे यांनी संपर्क करून त्यांना घाबरू नका शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. काहीही आवश्यकता वाटली तर संपर्क करण्याची विनंती कुटुंबाला केली आहे .
 
Top