नगर जिल्ह्यातील सुपा येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींनी पिडीतेवर हल्ला प्रकरणी आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना न्यायालयाकडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी व कठोर कारवाई पोलिसांकडून होणे गरजेचे... आ.डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे दि.१६/०८/२०२०- नगर जिल्ह्यात महिलां वरील अत्याचाराच्या वारंवार घटनांचे प्रकार सुरूच आहेत त्यात सुपा येथे दि.१४ ऑगस्ट,२०२० रोजी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्च २०२० मधील बलात्काराची केस मागे घेण्यासाठी महिलेला धमकाविण्यात आले असून यातील आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची दखल शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून पीडित कुटुंबाशी व उपचार करणाऱ्या डॉक्टरशी तब्येत बाबत विचारपूस केली. सदर प्रकरणातील पोलीस अधिकारी यांच्याशीही चर्चा केली आणि सदरील घटनेसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले आहे.

‘बलात्काराची केस मागे घे’,असे म्हणत एका महिलेच्या दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न झाला यात मुलगी १५ टक्के भाजली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा.पळवे, ता.पारनेर) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.

कोव्हिडं-१९ मुळे तुरुंगातील आरोपींना सोडण्या साठी निर्णय घेण्यात आला आहे. बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या व इतर घटनेत अटकेत असलेल्या आरोपींना कोव्हिडं-१९ मुळे जामीन मिळत आहे. जामीन मिळाला असला तरी देखील त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत परंतु याची अंमल बजावणी होताना दिसत नाही असे ही आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. तसेच पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.
सदरील घटनेतील अटकेत असलेल्या आरोपींना कोव्हिडं-१९ मुळे जामीन देण्याच्या निर्णय घेतला आहे. यामुळे पीडितेच्या जीवास धोका निर्माण झाला असल्याने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी. बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या व इतर घटनेतील आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना विविध निर्बंध न्यायालया कडून घालून देण्यात येत आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. न्यायालया कडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी व कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनास देण्यात यावेत. या मागण्या देखील निवेदनाच्या माध्यमातून आ.डॉ. गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केल्या आहेत.
 
Top