रक्षाबंधन सुरक्षा बंधन म्हणून साजरा करू

 पुणे दि.०३/०८/२०२०- आजपर्यंत आपण प्रत्येक सण उत्सव सर्वजण एकत्रित येऊन साजरे केले मात्र आता करोनामुळे ठरविक नागरिकांमध्ये साजरा करण्याची वेळ आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा रक्षाबंधन हा सण सुरक्षा बंधन म्हणून साजरा करून समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम करू या, अशा शब्दात माजी उपसभापती आ.नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. 

सहा दिवसात जीवनावश्यक वस्तुचे साहित्य वाटप करणार

     राखी पोर्णिमीच्या निमित्ताने प्रथम मुंबई शिक्षण संस्था व स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा माजी उपसभापती आ.डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकारातून आज पुणे शहरातील बुधवार पेठ भागातील रेड लाईट एरिया परिसरातील रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या १५० कुटुंबाना सोशल डिस्टेंसिंगमध्ये पुढील सहा दिवसात जीवनावश्यक वस्तुचे साहित्य वाटप केले जाणार आहे. सोशल डिस्टेंसिंगच्या कारणास्तव आज ५० कुटुंबांना वाटप करण्यात आले. 

  या प्रसंगी राजेंद्र शिंदे-शहर संघटक,बाळासाहेब मालुसरे-क्षेत्र समन्वयक,अनमोल परदेशी, मोहसीन शेख, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. या वाटपासाठी विशेष सहकार्य प्रथम संस्थेच्या फरीदा लांबे यांनी केले .संयोजन सौ. अश्विनी राजेंद्र शिंदे,मीना जाधव, वैशाली शिंदे, अस्मिता गायकवाड यांनी केले. 

    यावेळी माजी उपसभापती आ.डॉ.गोऱ्हे या उपस्थित महिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना म्हणाल्या की, आपल्या देशात मागील चार महिन्यापासून करोना महामारी आली आहे. त्या विरोधात समाजातील प्रत्येक घटक लढा देता आहे. आपल्या राज्यातदेखील जास्त रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या महामारीमधून आपल राज्य बाहेर पडण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक वेळी राज्याच्या जनतेला संबोधित केले. त्यावेळी सर्वांनी सूचनांचे पालन केल्याने, करोना सारखा आजार आपण नियंत्रणात आणू शकलो आहे. आता आणखी आपण काळजी घेण्याची गरज असून राज्य सरकारच्या आजपर्यंत पाठीशी राहिला तसेच यापुढे देखील पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरातील कोणत्याही भागा तील नागरिकांना अडचणींनी आल्यास शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
Top