*रक्षाबंधन (राखी पौर्णिमा)*- बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक  

श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन (राखी पौर्णिमा) या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला रक्षाबंधन (राखी पौर्णिमा)म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास,शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व या लेखातून विशद केले आहे.

     *रक्षाबंधनाचा इतिहास* 

 ‘पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.’

  ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस.इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

  भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.

*राखी बांधण्यामागील शास्त्र*

राखीपौर्णिमेच्या अर्थात् रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते. यमलहरी या पुरुषांच्या देहात जास्त प्रमाणात गतीमान होतात. याच कारणास्तव यमदूत किंवा यमराज यांना प्रत्यक्ष चित्र-साकारतेच्या दृष्टीने साकारतांना पुरुष स्वरूपात साकारले जाते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वहाणे चालू झाले की, त्यांची सूर्यनाडी जागृत होते आणि या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढून यमलहरी पूर्ण शरिरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण 3 प्रतिशतहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते; म्हणून प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सूर्यनाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येते.’

रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे.तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते. ‘तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्‍या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन सिद्ध करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतीमान वहन करण्यात अग्रेसर आहे. बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी.

*राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा !*

आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
 
Top