प्रचार प्रसार अभियानचा पंढरपूर शहराला मिळाला मान

पंढरपूर(प्रतिनिधी):- संपूर्ण देशामध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी पंढरपूरचे देविदास दामोदर यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.

या अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाला आत्मनिर्भर करण्यासाठी व प्रत्येकाला प्रधान मंत्री जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन सशक्त भारत निर्माण करावयाचा आहे. हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रत्येक गरिब, वंचित, सोशित भारतीयाला त्याचा लाभ होणार आहे.

राष्ट्रीय संघटक जयघोष महाराज यांच्या हस्ते दिलेले पत्र प्राप्त झाले असून या पंतप्रधान जन कल्याणकारी योजनेवर यशको पदनायक- आयुषमंत्री भारत सरकार, प्रह्लाद मोदी- राष्ट्रीय अध्यक्ष,

श्रीमती हेमामालिनी - लोकसभा सांसद, हंसराज हंस- लोकसभा खासदार ,श्रीमती जयाप्रदा - राष्ट्रीय अध्यक्ष -महिला प्रभाग, आशिष मिश्रा- प्रदेश संघटनमंत्री, श्रीमती डॉ नितू जैन- प्रदेश अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मनापासून प्रयत्न करणार 

महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजनेचा प्रचार व प्रसारासाठी तळागाळातील गोरगरीब वंचित लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मना पासून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देविदास दामोदर यांनी सांगितले.
 
Top