पिंपरी चिंचवड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले

पिंपरी चिंचवड - श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास व जिज्ञासा सोशल वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहराचे महापौर आणि आयुक्त यांनी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडत असल्याने तसेच पुणे शहर आरोग्य विभागाच्या हॉस्पिटल केलेल्या मागणीनुसार श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास,सांगवी व जिज्ञासा सोशल वेल्फेअर ट्रस्ट तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वायसीएम हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५/०८/२०२० रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.हे चौथे रक्तदान शिबिर होते.  

श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास,सांगवी व जिज्ञासा सोशल वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने 

त्यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर सौ.ढोरे , न्यासाचे अध्यक्ष शरद ढोरे ,न्यासाचे उपाध्यक्ष नंदकिशोर सगणे,सचिव मधुकर कोल्हे ,खजिनदार ओंकार आंबुलकर व श्री जिज्ञासा सोशल वेल्फेअर ट्रस्ट अध्यक्ष मोहन तोडकर ,कार्याध्यक्ष डॉ गणेश गरुड, उपाध्यक्ष मंगेश भुजबळ ,सचिव जीवन पवार, खजिनदार रोशन अहिरे, विश्वस्त आणि न्यासाचे, मंडळाचे कार्यकर्ते, सेवेकरी उपस्थित होते .
  

   पिंपरी चिंचवड महानगरपालिका,वायसीएम हॉस्पिटल रक्तपेढीचे सहकार्य  

या सर्वांच्यावतीने विजय केचे आणि डॉ गणेश गरुड यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वायसीएम हॉस्पिटल रक्तपेढीच्या सर्व मदतनिसांचे आभार मानले आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यापुढे संयुक्तरीतीने असेच समाजोपयोगी कार्यक्रम पार पाडू असे आपल्या भाषणात सांगितले. 

      हा कार्यक्रम कोरोना महामारीच्या काळात सोशल डिस्टंसिंग मास्क आणि वापरून करून पार पाडण्यात आला . कार्यक्रमाच्या शेवटी बब्रुवान वाघ यांनी श्रीं चा गजर करून कार्यक्रमाची सांगता केली.
 
Top