अध्यक्षपदी भगवान मनमाडकर, उपाध्यक्षपदी मिलिंद निकते आणि दादा फुगारे 


पंढरपूर - सोलापूर जिल्हा डेकोरेटर्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुका व शहर मंडप, स्पीकर,लाईट, जनरेटर असोसिएशन पंढरपूर येथे शाखा स्थापन करण्यात आली. 


   यावेळी अध्यक्षपदी भगवान मनमाडकर, उपाध्यक्षपदी मिलिंद निकते आणि दादा फुगारे, सचिवपदी प्रशांत बडवे , सहसचिवपदी नवनाथ अटकळे,खजिनदारपदी श्रीमंत गाजरे यांची निवड करण्यात आली .


  सदस्य म्हणून सुरेश परचंडे, आदित्य जोशी, शैलेश परचंडे ,गोरख कदम, शंकर गडदे ,विकास रोंगे यांची निवड करण्यात आली .निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा  बैठकीत सत्कार करण्यात आला आणि सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  
 
Top