पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाच्या निवड समितीत पालकमंत्री आदिती तटकरे यांची निवड
       अलिबाग,(जयपाल पाटील,जेष्ठ पत्रकार) - वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची दि.२६ जानेवारी २०२१ रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीत राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची निवड झाली आहे.

    पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचीदेखील या समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

   शासनाकडे पद्म पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस ही समिती केंद्र शासनाकडे करील.
 
Top