पुण्यातील कामगारांच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे आश्वासन...

पुणे दि.२८/०८/२०२० - पुण्यातील कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींची आज दि.२८ ऑगस्ट, २०२० रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा माजी उपसभापती विधानपरिषद आ.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होत्या. यावेळी कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष आ.डॉ.गोऱ्हे यांनी वेधले. विविध क्षेत्रातील कामगारांना आपली नौकरी गमवावी लागत आहे, घरकाम करणाऱ्या महिला कामगारांच्या प्रश्नावर या व इतर काही प्रश्नांवर बैठक घेण्याची सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडली याबाबत ना.अजित पवार यांनी तात्काळ बैठक घेण्यासाठी ना.दिलीप वळसे पाटील यांना सूचना दिल्या आहेत.

तसेच पुणे ग्रामीण जिल्हा परिषदने व्यवस्था केली. त्याप्रमाणे शहरात रेशन कार्डे नसलेल्यांची नावे मागवुन अन्नधान्य उपलब्धतेचा विचार व्हावा, अशी मागणी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली याबाबत ना.पवार यांनी अन्न व नागरी विभागाणी आ.डॉ. गोऱ्हे यांच्याशी संपर्क करून सुचनेवर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.खाजगी हाँस्पीटल्समध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे मनपा येथील महापौरांनी दर आठवड्यात इस्पितळांचे कामकाजाचे पाहणी करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत आमदारांना ही समाविष्ठ करून घेण्यात यावे, या मोहिमेसाठी दर आठवड्यात थोडा वेळ ना.पवार यांनी द्यावी अशी विनंती आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली.याबाबत ना.पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिली असून दोन्ही महापौर यांच्याशी चर्चा करून मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले.
 
Top