मंदिरे उघडण्यासाठी आज श्री पुंडलीक मंदिर येथे भाजप कार्यकर्ते व कोळी बांधवांचे घंटानाद आंदोलन

 पंढरपूर - येथे चंद्रभागातीरी असणाऱ्या श्री पुंडलिक मंदिर येथे भाजपाच्यावतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व पंढरपूर नगर परिषदेचे भाजपाचे गटनेते उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्या नेतृत्वाखाली मंदिराजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आला.

 यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी श्री पुंडलिक व वारकरी संप्रदायाचे अतूट नाते आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेचे स्नान व श्री पुंडलीकांचे दर्शन करून वारकरी भाविक श्री पांडुरंगाच्या दर्शनास जातात. सरकारने भाविकांच्या भक्तीच्या भावनेचा व समस्त पुजारी व मंदिरावर उपजिवीका असणाऱ्या कोळी समाजाच्या उपजिविकेचा प्रश्न मंदिर सुरु करून त्वरीत सोडवावा. सरकारच्या सूचनेनुसार,नियमानुसार मंदिर व्यवस्थापन भाविकाबाबत नियोजन करून त्यांना दर्शन देतील तरी महाविकास आघाडी सरकारने मंदिरे लवकर उघडावीत अशी भावना व्यक्त केली. या घंटानाद आंदोलनात श्री पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सतिश नेहतराव,श्रीमंत परचंडे,अनिल ज्यो अभंगराव, उत्तम परचंडे, महादेव अधटराव, मारुती संगितराव व कोळी समाज बांधव, होडी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी गणेश अंकूशराव ,नगरसेवक संग्राम अभ्यंकर,संजय निंबाळकर, शकुंतला नडगिरे,कृष्णा वाघमारे, बजरंग देवमारे आदिसह भाजपाच्या महिला आघाडीचे पदाधिकारी,शहर भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
Top