केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यप्रदेशात ९४०० कोटीहून जास्त खर्चाच्या ३५ महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार
नवी दिल्‍ली,PIB Mumbai २३/०८/२०२० -
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी मंगळवारी २५ ऑगस्ट २०२० रोजी मध्य प्रदेशात ३५ महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, नरेंद्र सिंग तोमर, राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल, फग्गनसिंग कुलस्ते आणि जनरल(डॉ.)व्ही. के.सिंग(निवृत्त) यांच्यासह मध्यप्रदेशचे मंत्री, आमदार आणि केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारीदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील. भूमिपूजन आणि उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये ११३९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या बांधणीसाठी ९४०० कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. 

   मध्यप्रदेशच्या विकासाचा मार्ग खुला करताना हे प्रकल्प चांगल्या दळणवळण सुविधा,आरामदायी प्रवास आणि आर्थिक विकासाला चालना देणार आहेत.चांगल्या रस्त्यांमुळे प्रवासी आणि माल वाहतूक करणारे चालक या दोघांचाही प्रवासाचा वेळ वाचणार आहे. विनाअडथळा प्रवासामुळे वाहनांमधून प्रदूषकांचे उत्सर्जन कमी होत असल्याने प्रदूषणात घट व्हायलाही यामुळे मदत होणार आहे.
 
Top