*पिसोळी ग्रामपंचायत येथील कुष्ठरोगी वसाहतीतील कुटुंबाना आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या वतीने अन्न धान्याच्या किटचे वाटप...*

      पुणे दि.०१/०८/२०२० - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व सामान्यांचे हाल झाले आहेत. यात कोणत्या ना कोणत्या आजाराने पीडित कुटुंबाचे तर हाल न विचारलेले बरे. अशाच पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील पिसोळी ग्रामपंचायत मध्ये राहणाऱ्या कुष्ठरोगीचे जीवन जगण्याचे हाल आहेत.

या कुटुंबांना मदत करण्याची विनंती त्यांच्यासाठी काम करणारे श्री डेव्हिड यांनी करत त्यांना धान्य मिळत नसल्याबाबत माजी उपसभापती विधान परिषद तथा स्त्री आधार केंद्रा अध्यक्ष आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांना केली. त्यांनतर आज आ.डॉ. गोऱ्हे या लोकांच्या मदतीला धावल्या. आ.डॉ. गोऱ्हे ह्या सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आल्या आहेत.याचा एक भाग म्हणून या ठिकाणी राहणाऱ्या ३५० कुटुंबांना धान्यांचे वाटप केले गेले. येथील २०० कुटुंबांना आज दि.०१ ऑगस्ट, २०२० रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने धान्य वाटप करण्यात आले. यासाठी ऍक्शन एडच्या नीरजा भटनागर यांना मदत केली होती.या कार्यक्रमाचे उदघाटन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आ.डॉ.गोऱ्हे यांनी केले.

यावेळी पिसोळी ग्रामपंचायत सरपंच मच्छिंद्र दगडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख शादाब मुलाणी, स्त्री आधार केंद्रचे कार्यकर्ते संजय सिरसाट उपस्थित होते.
 
Top